जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद यांचे आवाहन : आरोग्य खाते कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा
बेळगाव : तंबाखू सेवन टाळून आरोग्य निरोगी ठेवण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. आय. पी. गडाद यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत बेळगाव, जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण खाते बेळगाव, जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम बेळगाव तसेच राज्य तंबाखू नियंत्रण विभाग बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 18 रोजी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. गडाद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
व्यसनमुक्त समाजासाठी प्रयत्न करावे
जिल्हा क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. चांदणी यांनी तंबाखू व्यसनमुक्त केंद्रात उपलब्ध होणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना देऊन व्यसनमुक्त समाज निर्माणसाठी आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्यानंतर, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे (नवी दिल्ली) डॉ. उपेंद्र यांसह इतर मान्यवरांनी तंबाखू व्यसनमुक्त केंद्रामध्ये मिळणाऱ्या सुविधांची माहिती देण्यात आली. कार्यशाळेला आरोग्य खात्याच्या आशा हिरेमठ, रमेश हुल्लीकेरी, समुदाय आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जिल्हा तंबाखू व नियंत्रण विभागाच्या कविता राजण्णावर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.









