देवराष्ट्रे वार्ताहर
संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी होत असताना यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील राम मंदिर मात्र कुलुप बंद होते. दर्शनासाठी आलेले भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन परतत होते. अभयारण्य प्रशासनाच्या या भुमिकेमुळे भाविकांमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पूर्वी या मंदिरात मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी केली जात होती . मात्र अभयारण्य प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र रामनवमीनिमित्त फुलांसह विद्युत रोषणाईने सजली होती. मोठ्या उत्साहात दुपारी बारा वाजता ठिकठिकाणी रामजन्मकाळ साजरा करण्यात आला.परंतु अभयारण्यातील राममंदिर परिसरात मात्र शांतता होती.प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी भविकांमधुन होत आहे.
याबाबत वनमंत्री सुधीर मूनगुंटीवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, अभयारण्यातील राम नवमी उत्सवाची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करू.दुसरीकडे अभयारण्यातील राम मंदिरा बाबत लवकरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावु असे आश्वासन भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








