प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने अविन्या शिशिर-2024 व प्रयोग शिशिर-2024 या दोन प्रकल्पांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करून नाविन्यपूर्ण प्रकल्प बनविले आहेत.
प्रयोग शिशिर यामध्ये 60 हून अधिक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अविन्या शिशिर प्रदर्शनामध्ये 61 हून अधिक नाविन्यपूर्ण व सामाजिक हेतूने बनविलेले प्रकल्प मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भेट दिली.









