Avinash Bhosale ED Action : येस बँक घोटाळा प्रकरणी (Yes Bank Scam Case) पुण्यातील व्यावयासिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना दोन दिवसापूर्वी सीबीआयने हेलिकॉप्टर जप्त करत मोठा दणका दिला होता. आज पुन्हा ईडीने त्यांच्यावर आणि संजय छाब्रिया यांच्या मालमत्तेवर ईडीनं कारवाई केली आहे. यामध्ये अविनाश भोसलेंची 164 कोटी तर संजय छाब्रिया यांची 251 कोटाची संपत्ती जप्त केली. दोघांची मिळून 415 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. (ED Latest News)
ईडीनं नुकतीच मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी याबाबत छापेमारी केली. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट आणि ईओडब्ल्यूने छाब्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांवर साल 2020 मध्ये नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा नव्यानं दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुण्यातील हल्ल्यानंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, मारहाण करण्यापेक्षा…
अविनाश भोसले यांनी हजारो कोटींचा घोटाळा करून त्या पैशातून परदेशांत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप सीबाआयनं केला आहे. तर डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. संजय छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुपने डीएचएफएलकडून घेतलेल्या दोन हजार कोटी रूपयांच्या कर्जातील २९२ कोटी ५० लाख रुपये भोसले यांच्यामार्फत इतरत्र वळवण्यात आले. तसेच दोन कंपन्यांमार्फत ती रक्कम वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वरळीतील एक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातही भोसले यांना सल्ला शुल्क रक्कम मिळाली. प्रकल्पाचा संभाव्य खर्च, वास्तुविशारद व अभियांत्रिकी आराखडा, प्रकल्प बांधकाम व करार, वित्तीय मूल्यांकन व संरचना आदी गोष्टींबाबत भोसले यांच्या कंपन्यांकडून सल्ला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले होते. पण भोसले यांच्या कंपन्यांकडून अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नसल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








