कहाणीपासून फर्स्ट लुक अन् प्रदर्शनाची तारीख जाहीर
चित्रपटसृष्टीची मानसिकता बदलणारा जेम्स कॅमेरून यांचा चित्रपट ‘अवतार’च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. चित्रपटाचा सीक्वेल म्हणजेच ‘अवतार 2’ची घोषणा झाली असून याचा फर्स्ट लुक तसेच प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. निर्मात्यांनी या सीक्वेल चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. अवतार ः द वे ऑफ वॉटर’ असे याचे नाव असून तो जगभरात 160 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रफपट मोठय़ा पडद्यावर व्हिज्युअल्सना नव्या उंचीवर नेणारा ठरणार आहे.

2009 मध्ये प्रदर्शित ‘अवतार’ने जागतिक चित्रपटसृष्टीत इतिहास रचला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18,957 कोटी रुपयांची कमाई केली होती. आता ‘अवतार ः द वे ऑफ वॉटर’मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना व्हिज्युअल ट्रीट मिळणार आहे. अवतारच्या पहिल्या भागासोबत आम्ही मोठय़ा पडद्याच्या सीमांना पुढे नेण्यासाठी निघालो होतो. आता या नव्या अवतार चित्रपटासह आम्ही त्या सीमांना आणखीन पुढे नेणार आहोत. 3डीसोबत हाय डायनॅमिक रंज, हायर प्रेम रेट आणि अधिक रिझॉल्युशन आणि याचबरोबर आमचे व्हिज्युअल इफेक्ट्स यावेळी वास्तविकतेच्या अधिक जवळ जाणारे असतील असे कॅमेरून यांनी म्हटले आहे.
अवतार 2 चा टीझर आणि ट्रेलर लवकरच चित्रपटगृहांमध्ये सादर केला जाणार आहे. या चित्रपटाचा टीजर हॉलिवूडपट ‘डॉक्टर स्ट्रेंज 2’च्या प्रदर्शनाच्या आसपास जारी केला जाईल. डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस हा चित्रपट 6 मे रोजी प्रदर्शित होतोय. फॉक्स स्टुडियो पुन्हा एकदा चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. 16 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अवतार ः द वे ऑफ वॉटरमध्ये सॅम वर्थिंगटनचा जेक आणि जो सलदाना नेटियरीच्या जीवनाची कहाणी पुढे नेली जाणार आहे.









