के. आर. शेट्टी क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : के. आर. शेट्टी किंग्ज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित के. आर. शेट्टी निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून साईराज ब संघाने स्टार इलेव्हन संघाचा, अवनी स्पोर्ट्सने रायझींग स्टार गणेशपूरचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश मिळविला. विनायक लोहार, रोहीत पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले. जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात स्टार इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात सर्वगडी बाद 73 धावा केल्या. त्यात फैजलने 2 षटकार 3 चौकारांसह 25, आफ्रिदीने 13 धावा केल्या. साईराज बी.तर्फे विजय धामणेकरने 6 धावांत 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज ब ने 7.3 षटकात 6 गडी बाद 76 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात विनायक लोहारने 1 षटकार 3 चौकारांसह 21 व भूषणने 2 षटकार 1 चौकारासह 22 धावा जमविल्या. स्टारतर्फे शाहरुखने 15 धावांत 3 तर आफरोजने 13 धावांत 3 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात रायझींग स्टारने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 43 धावा केल्या. त्यात विनोदने 11, सौरभने नाबाद 10 धावा केल्या. अवनी स्पोर्ट्सतर्फे रोहीतने 7 धावांत 2 तर आकाशने 9 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अवनीने 2.1 षटकात बिनबाद 46 धावा करुन सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात रोहीत पाटीलने 2 षटकार 2 चौकारांसह नाबाद 23 तर मदन बामणेने 1 षटकार 2 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विनायक लोहार व रोहीत पाटील यांना सामनावीर तर विजय धामणेकर व आकाश कटांबले यांना इम्पॅक्ट खेळाटू म्हणून गौरविण्यात आले.
बुधवारचे सामने
एस.जी. स्पोर्ट्स वि. के.आर.शेट्टी किंग्ज सकाळी 9 वा. शिवसेना खादरवाडी वि. अयोध्या स्पोर्ट्स-कडोली स. 11 वा,, ए. के. स्पोर्ट्स वि. पहिल्या सामन्यातील विजेता दु. 1 वा. डेपो मास्टर्स अ. वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 3 वाजता









