वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळच्या उत्तरपूर्व भागात सोमवारी मोठे हिमस्खलन झाले असून यात कमीतकमी 7 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना यालुंग री नावाच्या पर्वतावर घडली असून त्याची उंची 5,630 मीटर आहे.
हिमस्खलनामुळे शिखराच्या बेस कॅम्पचे मोठे नुकसान झाले असून यावेळी तेथे अनेक विदेशी गिर्यारोहक होते. चार जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मृतांमध्ये 3 अमेरिकन, 1 कॅनेडियन, एक इटालियन आणि दोन नेपाळी नागरिक सामील आहेत अशी माहिती डोलखा जिल्ह्याचे उपपोलीस अधीक्षक ग्यान कुमार महतो यांनी दिली. यालुंग री हे शिखर बागमती प्रांतातील रोलवालिंग खोऱ्यात आहे.









