ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या हिमस्खलनामुळे दरीत पडून जेसीओसह तीन जवानांना वीरमरण आले.
श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने केलेल्या ट्विटनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील माछिल सेक्टरमध्ये कनिष्ठ आयोग अधिकाऱ्यासह दोन जवान नियमित गस्त घालत होते. त्यावेळी झालेल्या हिमस्खलनामुळे खोल दरीत पडून तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. या तिन्ही जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : ‘G 20’च्या पार्श्वभूमीवर पुण्यात 3765 गुन्हेगारांची झाडाझडती









