चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी / बेळगाव
घरासमोर उभी करण्यात आलेली ऑटोरिक्षा चोरण्यात आली आहे. सोमवारपेठ, टिळकवाडी येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. टिळकवाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सोमवारपेठ येथील अजय शहापूरकर यांची केए 22 बी 33 क्रमांकाची ऑटोरिक्षा घरासमोर उभी करण्यात आली होती. मंगळवार दि. 11 एप्रिल रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ऑटोरिक्षातून आलेल्या दोघा जणांनी ही रिक्षा ढकलत नेली आहे.
हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. रिक्षा चोरणाऱ्यांपैकी एकाने पठाणी ड्रेस घातला होता. अजय शहापूरकर यांनी टिळकवाडी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असून भरदिवसा रिक्षा चोरणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. शहर व उपनगरांत चोऱ्या, घरफोड्या व वाहन चोरीचे प्रकार वाढले आहेत.









