शीत शवपेटी उपलब्ध,आम, प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्याला यश
राधानगरी/प्रतिनिधी
शासन आपल्या दारी योजनेच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे शवविच्छेदन गृह नसल्यामुळे निम्म्याहून अधिक तालुक्यातील लोकांना ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर येथे शव विच्छेदन करण्यास जावे लागत होते. याबाबत गेल्या आठवड्यात बैठकीमध्ये ग्रामीण रुग्णालय,राधानगरी येथे शव विच्छेदन गृह बांधण्याच्या सूचना वैद्यकीयअधीक्षक डॉ.गवळी यांना केल्या होत्या, तसेच एखादा रुग्ण किंवा तालुक्यातील व्यक्ती दगावल्यास त्यांचे नातेवाईक लांब पल्ल्याच्या ठिकाणी किंवा बाहेर देशांमध्ये असल्यानंतर शव खुले स्वरूपात किंवा कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये शीत शववाहिकेमध्ये ठेवावे लागत होते. याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक यांना सूचना देऊन ग्रामीण रुग्णालय राधानगरी येथे तात्काळ शीत शवपेटी देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज शीत शवपेटी रुग्णालयात दाखल झाली ,यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड थांबणार आहे.
तसेच तालुक्यामध्ये वाढते डायलिसिसचे रुग्ण पाहता या ठिकाणी डायलिसिस मशीन देण्याच्या सूचना जिल्हा शक्य चिकित्सक यांना देण्यात आल्या आहेत. ते लवकरच आपल्याकडे दाखल होणार आहे. या बरोबर या ठिकाणी नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये किडनी व आर्थो (हाडांची) शस्त्रक्रिया विभाग नव्याने सुरू होणार आहे. यामुळे राधानगरी तालुक्यातील रुग्णांना कोल्हापूर किंवा बाहेरील खाजगी रुग्णालयात जावे लागणार नाही.
याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गवळी व त्यांच्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्याकडून या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम सुरू असून वैद्यकीय शस्त्रक्रिया ही अत्यंत चांगल्या प्रकारे सुरू आहेत.
यावेळी गोकूळ संचालक अभिजीत तायशेटे, राज्य आत्मा समिती सदस्य अशोक फराकटे, आत्मा समिती सदस्य दिपक शेट्टी, माजी उपसरपंच सचिन पालकर , विलासराव डवर,वैभव चौगले, मयूर पवार, मिथुन पारकर, युवराज पाटील, एम.डी.चौगले, भिकाजी तोडकर, संजय पाटील, ओमकार निंबाळकर ,पंढरीनाथ खांडेकर यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व स्टाफ उपस्थित होता.