राधानगरी,प्रतिनिधी
Kolhapur Rain Update : गेल्या महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवार पासून हजेरी लावल्याने आज सकाळी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी धरणाचा 6 क्रमाकांचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे. पावसाअभावी कोमजलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
आज रविवारी सकाळी 6 वाजता पाणी पातळी 347.28,पाणी साठा 8319.57 इतका असून, 6 क्रमाकांच्या दरवाज्यातून 1428 क्यूसेक व खाजगी जलविद्युत केंद्रातून 1400 क्यूसेक असा एकूण 2828 विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.
काल दिवसभरात 51 मी.मी इतका पाऊस नोंदला आहे. तर आजतागायत 3474 मी. मी पाऊस नोंदवला आहे.राधानगरी तालुक्यासह जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने डोंगराळ भागात खरिप पेरा वाया जाण्याची भीती होती. मात्र, पावसाने पुन्हा सुरवात केल्याने शेतकऱ्याकडून समाधान व्यक्त होत आहे.









