सौर उर्जेवर चालणारे पश्चित विभागातील पहिले हवामान केंद्र
फोंडा : हवामान बदल प्रकल्प सहकार्याचा एक भाग म्हणून सिटी युविव्हर्सिटी ऑफ न्युयॉर्क आणि ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज यांनी फर्मागुडी फोंडा येथील गोव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संकुलातील आयआयटीमध्ये सौर उर्जेवर चालणारे स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्विन केले आहे. या स्थापनेमुळे आयआयटी गोवा हे अशाप्रकारचे स्टेशन असलेले राज्यातील एकमेव कॅम्पस बनले आहे. जे स्टेकहॉल्डर्ससोबत ऑनलाईन आणि स्मार्टफोन अॅपद्वारे प्राप्त डेटा आपोआप शेअर करेल. वातावरणा बदलांशी लढा देण्याच्या उद्देशाने कन्सुलेट अनुदानित प्रकल्पाला ब्रॉन्स कम्युनिटी कॉलेजच्या रसायनशास्त्र, पृथ्वी, विज्ञान आणि पर्यावरण विज्ञान विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक नील फिलीप आणि प्रा. परमिता सेन उपस्थित होते. आयआयटी इमारतीच्या टेरेसवर सौरउर्जेवरील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यावेळी समान विभाग ओलावा, ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेजचे विद्यार्थी, बॉन्क्स कम्युनिटी कॉलेज आणि सिटी युनिव्हर्सिट ऑफ न्युयॉर्कचे प्राध्यापक प्रतिनिधी कश्यप पांड्या, वरिष्ट माध्यम सल्लागार अमेरिका,मुंबई येथील वाणिज्य दुतावास, आयआयटी गोवाचे संचालक बी के मिश्रा, प्राध्यापक शरद सिन्हा, गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्dयापक उपस्थित होते.
ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेजच्या सहाय्याने हवामान केंद्राची स्थापना
प्रा. नील पिलीप आणि प्रोफेसर परमिता सेन यांच्या नेतृत्वाखाली ब्रॉन्क्स कम्युनिटी कॉलेज टिम देशात सौरउर्जेवर चालणारी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापित करणे सुलभ करण्यासाठी स्थानिक देशासोबत काम करत आहे. ही हवामान केंद्रे हवेच्या गुणवत्तेवर आणि मातीच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवतील असे सेन यांनी स्पष्ट केले. आयआयटी गोव कॅम्पस हे अशाप्रकारे स्टेशन बनवणारे देशातील पहिले पश्चिम विभाग आहे. संपुर्ण देश व्यापण्याचे लक्ष्य असून पुर्व विभागात आठ महाविद्यालयांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. उत्कृष्ट आणि अचूक प्रणालीद्वारे हवामान केंद्राकडून प्राप्त होणारा डेटा स्टेकहॉल्डर्ससह ऑनलाईन आणि स्मार्टफोन अॅप प्लॅटफॉर्मद्वारे स्वयंचलितपणे सामायिक केला जाईल. आणि अॅप्स डाऊनलोड करून कोणालही या माहितीमध्ये प्रवेश मिळेल. प्रणालीच्या स्थापनेव्यक्तीरीत टिमने हवामान आणि हवामान बदलावरील ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी सामुहिक सामाजिक शिक्षण आणि थीमॅटिक कम्युनिकेशन कार्यशाळा देखील आयोजित केली. याशिवाय टिमने हवामान बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी नवीन उपकरणांच्या वापराचे प्रात्यक्षिकही दाखवले.









