फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालामधून माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात वाहनांच्या विक्रीचे प्रमाण वाढलेले असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रवासी वाहने तसेच दुचाकी वाहने, व्यावसायिक वाहनांसह सर्व विभागांमध्ये वाढ नोंदवली गेल्याचे दिसून आले आहे. फाडानुसार, जुलै 2023 मध्ये, वाहन विक्रीत 10 टक्के वाढ नोंदवली गेली. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) ने जुलै महिन्यात एकूण 17,70181 वाहनांची विक्री झाली. यामध्ये प्रवासी वाहने, तीनचाकी, दुचाकी वाहनांचा समावेश आहे. वर्षभराच्या आकडेवारीनुसार, जुलै 2022 मध्ये देशभरात एकूण 16,09217 युनिट्सची विक्री झाली.
12 लाख दुचाकी, 2 लाख 84 लाख प्रवासी वाहनांचा खप
फाडाने सादर केलेल्या अहवालानुसार, जुलै 2023 मध्ये, प्रवासी वाहन विभागात 2,84,064 युनिट्सची विक्री झाली. तर जुलै 2022 मध्ये ही संख्या 2,73,055 होती. दुचाकी विभागात, जुलै 2023 मध्ये मोटरसायकल, स्कूटर आणि मोपेडची एकूण विक्री 12,28,139 युनिट्स होती. त्याच वेळी, तीनचाकी वाहन विक्रीचे एकूण योगदान 94,148 युनिट होते. जुलैमध्ये ट्रॅक्टरच्या 90765 युनिट्स आणि व्यावसायिक वाहनांच्या 73065 युनिट्सची विक्री झाली असल्याची माहिती आहे.
किती वाढ?
जुलै 2023 मध्ये प्रवासी वाहन विभागात सुमारे चार टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुचाकींच्या विक्रीत आठ टक्क्यांनी वाढ झाली असून जुलै महिन्यात तीनचाकी वाहनांची विक्री 74 टक्क्यांहून अधिक होती. जुलै 2023 मध्ये, 2022 च्या तुलनेत देशभरात 10 टक्क्यांहून अधिक विक्री झाली आणि व्यावसायिक वाहन विभागात सुमारे दोन टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली असल्याची माहिती आहे.









