ऑनलाईन टीम/मेलबर्न
महिलांच्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत एकही सामना न गमावणाऱ्या भारतीय संघाला अंतिम सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाकडून 85 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 4 विकेटच्या मोबदल्यात टीम इंडियाला 185 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारतीय खेळाडूंना 19.1 षटकांत सर्वबाद 99 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 184 धावांचे आव्हान घेवून फलदांजीसाठी मैदानात उतरलेल्या भारताचा सुरुवात खराब झाली. सलामीवीर शेफाली वर्मा पहिल्या षटकातच तिसर्या चेंडूवर 2 धावा करत बाद झाली. शर्मा हिच्या विकेटनंतर भारताला पहिला धक्का बसला. यानंतर लगेचच तानिया भाटिया हिच्या हेलमेटवर चेंडू आदळल्याने ती बाद झाली. यामुळे भारतासमोर विजयाची वाट अधिकच खडतर झाली.
सलामीवीर बेथ मुनी हिच्या नाबाद 78 धावाच्या झुंजारी खेळीने ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 185 धावाचे आव्हान उभे केले. हिली आणि मुनी यांनी केलेल्या धमाकेदार खेळीमुळे भारताच्या गोलदांजाची चांगलीच दमछाक उडाली. हिली हिने 39 चेंडूत 75 तर मुनी हिने नाबाद 54 चेंडूत 78 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलदांजी करताना ऑस्ट्रेलियाने बिनबाद अर्धशतक झळकावले आहे. भारतीय संघाकडून खराब गोलदांजी झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीर जोडीने भारताची चांगलीच धुलाई केली. मात्र राधा यादव हिने अॅलिसाला झेलबाद करत संघास पहिली विकेट मिळवून दिली. यानंतर दिप्ती शर्माने दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने आपल्या धमाकेदार खेळीने संघाची धावसंख्या वाढतच ठेवली. यातच पूनम हिने 18 व्या षटकात 4 विकेट घेत ऑस्ट्रेलिया आणखीन एक धक्का दिला.पहील्या पाच षटकात 30 धावा करतच भारताला चार धक्के बसले आहेत.
ऑस्ट्रेलिया संघ चार वेळा विजेता ठरला आहे. मात्र यंदाच्या हंगामात भारताने सलामीच्या लढतीतच ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती. त्यामुळे आजच्या या लढतीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला धूळ चारत या विजेतेपदावर आपले नाव कोरणार का? याकडे सर्वच क्रिडाप्रेमीचे लक्ष लागून राहिले आहे