वृत्तसंस्था/ बाकू
2024 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी सध्या सुरु असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेतील येथे सोमवारी झालेल्या फ गटातील सामन्यात ऑस्ट्रीयाने अझरबेजानचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत आपली पात्रता सिद्ध केली आहे.
ऑस्ट्रीया आणि अझरबेजान यांच्यातील या पात्र फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रीयातर्फे एकमेव निर्णायक गोल उत्तरार्धामध्ये सबीझेरने स्पॉट कीकवर नोंदविला. त्यानंतर सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना अझरबेजानने गोल करण्याची सोपी संधी गमाविली. ऑस्ट्रीया संघातील बर्जस्टीलरला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढल्याने त्याला शेवटच्या 20 मिनिटांमध्ये 10 खेळाडूंनीशी खेळावे लागले. पात्र फेरीच्या स्पर्धेतील ऑस्ट्रीयाचा सात सामन्यातील हा पाचवा विजय आहे. ऑस्ट्रीयाने फ गटातून आघडीचे स्थान मिळविले असून या गटात स्वीडनचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रीयाने स्वीडनपेक्षा 10 गुण अधिक मिळविले आहेत.









