वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाची आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला ऍथलिट तसेच तिहेरी उडीतील ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती कायली मॅकओनने शुक्रवारी महिलांच्या 200 मी. बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात नवा विश्वविक्रम केला.
सिडनीच्या ऑलिम्पिक जलतरण संकुलात सुरू असलेल्या एन. एस. डब्ल्यू, स्टेट खुल्या जलतरण स्पर्धेत महिलांच्या 200 मी. बॅकस्ट्रोक प्रकारात कायलीने 2 मिनिटे 03.14 सेकंदाचा अवधी घेत नवा विश्वविक्रम नोंदविताना 2019 साली झालेल्या विश्व जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेत अमेरिकेची जलतरणपटू रेगान स्मिथने नोंदविलेला 2 मिनिटे 03.35 सेकंदाचा विश्वविक्रम मोडीत काढला. 21 वर्षीय कायली मॅकओनने महिलांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकमध्येही विश्वविक्रम नोंदविला असून तिने 2021 साली झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तीन सुवर्णपदके मिळविली होती. येत्या जुलै महिन्या जपान येथे होणाऱया विश्व जलतरण स्पर्धेत कायली मॅकओन पुन्हा जलतरणाच्या या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व ठेवण्यासाठी सज्ज राहील.









