वृत्तसस्था/ दुबई
आयसीसीच्या नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या महिलांच्या टी-20 प्रकारातील अष्टपैलूंच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू ऍश्ले गार्डनरने अग्रस्थानावर झेप घेतली आहे.
भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अंतिम सामन्यात गार्डनरने विजयी खेळी केली होती. तिने या सामन्यात 32 चेंडूत नाबाद 66 तर गोलंदाजीत 20 धावात 2 गडी बाद केले होते. विंडीजची मॅथ्यूज या मानांकन यादीत दुसऱया, भारताची दीप्ती शर्मा तिसऱया, न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन चौथ्या स्थानावर आहे.









