वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू ऍश्ले गार्डनरची टी-20 महिला फलंदाजांच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. या मानांकनातील तिचे स्थान वधारले आहे. भारताविरुद्ध सध्या सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात गार्डनरच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताचा 7 धावांनी पराभव करून मालिका हस्तगत करता आली. या मानांकनात भारताच्या रिचा घोषनेही
भारताविरुद्धच्या या सामन्यात तिने फलंदाजीत 42 धावा तर गोलंदाजीत 20 धावात 2 गडी बाद केले. टी-20 च्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत गार्डनर आता नवव्या स्थानावर आहे. तिचे स्थान एका अंकांनी वधारले आहे. तसेच तिने टी-20 गोलंदाजांच्या मानांकन यादीत 17 वे स्थान मिळवले आहे. यापूर्वी ती 26 व्या स्थानावर होती. 25 वर्षीय गार्डनरने अष्टपैलूंच्या मानांकन यादीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
इंग्लंडची फलंदाज सोफिया डंक्लेने टी-20 च्या फलंदाजांच्या मानांकन यादीत बाराव्या स्थानावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू एलीस पेरी 17 व्या तर भारताची रिचा घोष चार स्थानांची प्रगती करीत 40 व्या स्थानावर पोहोचली आहे. इंग्लंडची कर्णधार नाईटने 31 वे स्थान तर भारताच्या दीप्ती शर्माने संयुक्त 32 वे स्थान मिळवले आहे. फलंदाजांच्या मानांकन यादीत विंडीजची कर्णधार हेली मॅथ्यूजने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे तसेच तिने अष्टपैलूंच्या मानांकन यादीत दुसरे स्थान मिळवले आहे.









