वृत्तसंस्था/ मँचेस्टर
2023 च्या डेव्हिस चषक फायनल्स टेनिस स्पर्धेत येथे खेळवण्यात आलेल्या लढतीत अॅलेक्स डी मिनॉर आणि कोकिनाकीस यांच्या शानदार विजयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्वित्झर्लंडचा पराभव करत अंतिम 8 संघात प्रवेश मिळवला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि स्वीस यांच्यातील या लढतीत झालेल्या पहिल्या एकेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कोकिनाकीसने स्विसचे स्ट्रिकेरचा 6-3, 7-5 तर दुसऱ्या एकेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनोरने स्वीसच्या मार्क हुसलेरचा 6-4, 6-3 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डन आणि प्युरसेल या जोडीने स्वीसच्या हुसलेर आणि स्टिकेर यांचा 6-2, 6-4 असा पराभव केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने या लढतीत स्वीसचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. ब गटातील ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यातील विजयी संघाबरोबर ऑस्ट्रेलियाची पुढील फेरीत लढत होईल. झेक प्रजासत्ताक आणि सर्बिया यांनी शेवटच्या आठ संघामध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे.









