अॅलिसा हिलीकडे कर्णधारपद, मॉलिन्युक्सचे पुनरागमन
वृत्तसंस्था / कॅन्बेरा
भारत आणि लंका यांच्या संयुक्त यजमानपदाने 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलिया महिला संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये फिरकी गोलंदाज सोफी मॉलिन्युक्सचे पुनरागमन झाले आहे.ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात सातवेळा अजिंक्यपद मिळविले आहे. 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना 1 ऑक्टोबरला न्यूझीलंडबरोबर खेळविला जाणार आहे. गेल्या वर्षी गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर मॉलिन्युक्सला बऱ्याच कालावधीसाठी क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले आहे.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी अनुभवी अॅलिसा हिलीकडे ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले असून ग्रेसहॅरिसने गोलंदाजांच्या मानांकन यादीत अंतिम फेरी तर जॉर्जिया व्हॉलने महिलांच्या विभागात दर्जेदार कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघ: अॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राऊन, अॅस्ले गार्डनर, किम गॅरेथ, ग्रेस हॅरिस, अॅलेना किंग, फोबे, लिचफिल्ड, ताहीला मॅकग्रा, सोफी मॉलिन्युक्स, बेथ मुनी, इलेसी पेरी, मेगांन्स कूट, अॅनाबेल सुदरलँड, जॉर्जीया व्हॉल आणि जॉर्जीया वेअरहॅम यांचा समावेश आहे.









