वृत्तसंस्था / मेलबर्न
रशियामध्ये ऑस्ट्रेलियन टेनिसपटूंना कोणत्याही स्पर्धेत खेळू नये, अशी ताकीद टेनिस ऑस्ट्रेलियाने दिली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या तणावग्रस्त परिस्थितीमुळे टेनिस ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना रशियात खेळण्यापासून सावध केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिस चषक संघातील टेनिसपटू कोकीनाकिस याने दोन महिन्यांपूर्वी सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात आपला सहभाग दर्शविला होता. पिटर्सबर्गमधील ही प्रदर्शनीय स्पर्धा 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान झाली आणि या स्पर्धेत टेनिस ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आदेशाचा भंग करत कोकीनाकिसने आपला सहभाग दर्शविला होता.









