वृत्तसंस्था/ दुबई
सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी ब गटातून पात्र ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे दुबईत आगमन झाले. तसेच दक्षिण आफ्रिकेचा संघही दुबईकडे रवाना होत आहे.
या स्पर्धेत प्राथमिक गटातील शेवटचा सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात येथे रविवारी झाला. ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका तर अ गटातून भारत आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. आता रविवारच्या सामन्यातील निकालानंतर उपांत्य फेरीच्या लढतीतील संघ निश्चित होती. दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात उपांत्य फेरीत गाठ पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रविवारचा सामना भारताने जिंकल्यास अ गटातून भारत पहिल्या स्थानावर राहिल. तर ब गटातून आघाडीवर असलेला दक्षिण आफ्रिकेची गाठ न्यूझीलंड बरोबर होऊ शकेल.









