वृत्तसंस्था/ मेलबर्न
येत्या ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणाऱया झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन वनडे मालिकांसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी संघाची घोषणा केली. या दोन्ही मालिकांसाठी कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये टेविस हेडला वगळण्यात आले आहे. गोलंदाज सीन ऍबॉट व ऍडम झाम्पा यांचे पुनरागमन झाले आहे. ऍस्टन ऍगरलाही संधी मिळाली आहे. फिरकी गोलंदाज मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू कुहेनमन आणि वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन यांना या दोन्ही मालिकांसाठी वगळण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान खेळविली जाईल. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील वन डे मालिका 6 ते 11 सप्टेंबर दरम्यान होणार आहे. या दोन्ही मालिका आयसीसीच्या विश्वचषक सुपरलिग अंतर्गत राहतील. 2020 च्या डिसेंबरनंतर ऑस्ट्रेलियन संघाची मायदेशातील ही पहिली वन डे मालिका आहे.
ऑस्ट्रेलिया वन डे संघ- फिंच, ऍबॉट, ऍग्येर, कॅरे, कॅमेरून ग्रीन, हॅझलवूड, लाबुसिंगे, मिचेल मार्स, मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, स्टोनीस, वॉर्नर आणि झम्पा.









