मेलबर्न :
ऑस्ट्रेलियात एका खासदाराने दोन पुरुषांचे लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले आहे. लैंगिक शोषणाच्या या दोन्ही घटना दोन वर्षांच्या कालावधीत घडल्या होत्या. न्यू साउथ वेल्सच्या कियामाचे 44 वर्षीय खासदार गॅरेथ वार्ड यांना डाउनिंग सेंटर जिल्हा न्यायालयात ज्युरींनी दोषी ठरविले आहे. 2013 मध्ये एका 18 वर्षीय युवकाचे लैंगिक शोषण आणि 2015 मध्ये 24 वर्षीय पुरुषाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी न्यायालयाने वार्ड यांना दोषी ठरविले. फेब्रुवारी 2013 मध्ये खासदाराने युवकाला स्वत:च्या साउथ कोस्ट येथील घरी बोलाविले होते. पीडित इसमाच्या विरोधानंतरही एकाच रात्री खासदाराने त्याचे तीनवेळा लैंगिक शोषण केले होते. तर 2015 मध्ये खासदाराने मद्यधुंद अवस्थेत एका कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केले होते. वार्ड यांना याप्रकरणी सशर्त जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.









