ट्रॅव्हिस हेड, जोश हेझलवूडचे पुनरागमन
वृत्तसंस्था / कॅनबेरा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 आणि एकदिवशीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 14 सदस्यीय संघ जाहीर केला असून ट्रॅव्हिस हेड व जोश हेझलवूड यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
अष्टपैलु मॅट शॉर्ट देखील संघात परतला आहे. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मासलिकेतील प्रभावी कामगिरीमुळे दोन्ही संघात समावेश करण्यात आलेला आक्रमक फलंदाज मिच ओवेन एकदिवशीय पदार्पणासाठी शर्यतीत आहे. नियमीत एकदिवशीय कर्णधार पॅट कमिन्स वर्षाच्या अखेरीस व्यस्त वेळापत्रकाचा विचार करून बाजूला झाला आहे. मिचेल मार्श हा एकदिवशीय कर्णधार म्हणून काम करत राहील. तर जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्कलाही मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज मालिकेनंतर शॉन अॅबॉट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, तनवीर सांघा, कूपर कॉनोली आणि आरोन हार्डी हे खेळाडू वगळण्यात आले आहेत. मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी संकेत दिले आहेत की संघ पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकासाठी तयारी करत राहील.
ऑस्ट्रेलियाची टी-20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, टिम डेव्हिड, बेन द्वारशुइस, नाथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, अॅडम झाम्पा.
ऑस्ट्रेलिया एकदिवशीय संघ : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नाथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लाबुशेन, लान्स मॉरिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, झाम्पा.
मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना 10 ऑगस्ट-डार्विन
दुसरा टी-20 सामना 12 ऑगस्ट-डार्विन
तिसरा टी-20 सामना 16 ऑगस्ट-केर्न्स
एकदिवशी वेळापत्रक
पहिला एकदिवशीय सामना- 19 ऑगस्ट-केर्न्स
दुसरा एकदिवशीय सामना-22 ऑगस्ट-मॅके
तिसरा एकदिवशीय सामना -24 ऑगस्ट-मॅके









