वृत्तसंस्था/ मँचेस्टर
यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी उभय संघातील चौथी कसोटी अनिर्णित राहिली. या सामन्यातील खेळाचा शेवटचा दिवस पावसामुळे वाया गेला. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 2-1 अशी आघाडी मिळवली असून त्यांनी स्वत:कडे पुन्हा अॅशेस राखले आहे. या मालिकेतील शेवटची कसोटी बाकी असून इंग्लंडला मालिका बरोबरी करण्याची संधी मात्र निश्चित आहे.
या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 317 धावा जमवल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 592 धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात शेवटच्या दिवसाअखेर 71 षटकात 5 बाद 214 धावा जमवल्या. या कसोटीत इंग्लंडला विजयाची निश्चितच संधी होती पण पावसाने ती हिरावून घेतली. इंग्लंडची मात्र अॅशेस जिंकण्याची संधी हुकली. आता ते ही मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतील.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 317, इंग्लंड प. डाव 592, ऑस्ट्रेलिया दु. डाव 71 षटकात 5 बाद 214.









