वृत्तसंस्था / मेलबर्न
कॉनर मेटकाफ आणि मिशेल ड्युकने नोंदवलेल्या गोलांमुळे ऑस्ट्रेलियाने सौदी अरेबियावर 2-1 असा विजय मिळविल्यानंतर ते सलग सहाव्या विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.
2026 च्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना फक्त पाच गोलांनी पराभव टाळण्याची गरज होती. ऑस्ट्रेलियाने पिछाडी भरून काढत मेटकाफने केलेल्या गोलने हाफटाईमच्या अगदी आधी बरोबरी साधली आणि ड्यूकने 48 व्या मिनिटाला हेडरने त्यांना आघाडी मिळवून दिली. 19 व्या मिनिटानंतर अब्दुलरहमान अल ओबौदने सौदीचा गोल केला होता. गोलकीपर मॅट रायनने ऑस्ट्रेलियासाठी त्याच्या 100 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एका पेनल्टीसह पाच बचाव केले. सॉकरुजना 2018 आणि 2022 मध्ये प्लेऑफमध्ये खेळून पात्र व्हावे लागले होतो. त्यामुळे आता थेट प्रवेश मिळवल्याने त्यांच्यावरील दबाव कमी झाला. पोपोविक 2006 मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पात्र ठरलेल्या सॉकरुस संघाचा भाग होता.
अन्य लढतीत जपान आणि दक्षिण कोरियाने अनुक्रमे इंडोनेशिया आणि कुवेतवर घरच्या मैदानावर विजय मिळवत मोहिमेची यशस्वी सांगता केली. ओसाकामध्ये दाईची कामदाने 15 मिनिटांत गोल करुन सलग आठव्या विश्वचषकाची तयारी करणाऱ्या जपानला 6-0 असा विजय मिळवून दिला तर दक्षिण कोरियाने कुवेतवर 4-0 अशा गोलफरकाने मात केली. त्यांनी सलग 11 व्या वेळी वर्ल्ड कप पात्रता मिळविली आहे.









