वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
येथे सुरू असलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया आणि विंडीज यांच्यातील दिवस-रात्रीच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियन संघाला निर्णायक विजयासाठी 156 धावांची जरुरी आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 60 धावा जमवल्या होत्या. विंडीजकडून त्यांना निर्ण्याक विजयासाठी 216 धावांचे आव्हान देण्यात आले होते.
या सामन्यात विंडीजने पहिल्या डावात 311 धावा झळकवल्या. हॉजने तसेच डिसिल्वा आणि सिंक्लेयर यांनी अर्धशतके झळकवली. हॉजने 1 षटकार आणि 8 चौकारासह 71, जोशुआ डिसिल्वाने 7 चौकारासह 79, सिक्लेयरने 1 षटकार आणि 5 चौकारासह 50, जोसेफने 7 चौकारासह 32, चंद्रपॉल आणि मॅकेन्झी यांनी प्रत्येकी 21 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मिचेल स्टार्कने 4 तर हॅझलवूड आणि लियॉन यांनी प्रत्येकी 2 तसेच कमिन्सने एक गडी बाक केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 53 षटकात 9 बाद 289 धावावर घोषित करण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या डावात उस्मान ख्वाजा, अॅलेक्स कॅरे, कर्णधार कमिन्स यांनी दमदार अर्धशतके झळकवली.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ख्वाजाने 10 चौकारासह 75, कॅरेने 1 षटकार आणि 9 चौकारासह 65 कर्णधार कमिन्सने 1 षटकार आणि 8 चौकारासह नाबाद 64, मिचेल मार्शने 1 षटकार आणि 3 चौकारासह 21, लियॉनने 1 चौकारासह 19 धावा जमवल्या. विंडीजतर्फे अल्झेरी जोसेफने 84 धावात 4 तर रॉचने 47 धावात 3 तसेच शेमर जोसेफ आणि सिंक्लेयर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
22 धावांची आघाडी घेतल्यानंतर विंडीजने 1 बाद 13 या धावसंख्येवरून शनिवारच्या खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 72.3 षटकात 193 धावात आटोपला. मॅकेन्झीने 6 चौकारासह 41, अॅथेन्झेने 3 चौकारासह 35, हॉजने 4 चौकारासह 29, ग्रिवेसने 4 चौकारासह 33, कर्णधार ब्रेथवेटने 2 चौकारासह 16, सिंक्लेयरने 3 चौकारासह नाबाद 14 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियातर्फे हॅझलवूड आणि लियॉन यांनी प्रत्येकी 3 तर ग्रीन आणि स्टार्क यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शेमर जोसेफ दुखापतीमुळे 3 धावावर निवृत्त झाला.
ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजयासाठी 216 धावांचे आव्हान विंडीजने दिले. तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 2 बाद 60 धावा जमवल्या होत्या. स्टिव्ह स्मिथ 5 चौकारासह 33 तर ग्रीन 9 धावावर खेळत आहेत. ख्वाजा 10 धावावर तर लाबुशेन 5 धावावर बाद झाले. विंडीजतर्फे अल्झेरी जोसेफ आणि ग्रिवेस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव 108 षटकात सर्वबाद 311, ऑस्ट्रेलिया प. डाव 53 षटकात 9 बाद 289 डाव घोषित (ख्वाजा 75, कॅरे 65, कमिन्स नाबाद 64, मार्श 21, ए. जोसेफ 4-84, रॉच 3-47, एस. जोसेफ आणि सिंक्लेयर प्रत्येकी एक बळी), विंडीज दु. डाव 72.3 षटकात सर्वबाद 193 (मॅकेन्झी 41, अॅथेन्झे 35, हॉज 29, ग्रिवेस 33, हॅझलवुड 3-23, लियॉन 3-42, स्टार्क, ग्रीन प्रत्येकी एक बळी), ऑस्ट्रेलिया दु. डाव 2 बाद 60 (स्मिथ खेळ आहे 33, ग्रीन खेळत आहे 9, ख्वाजा 10, लाबुशेन 5, ए. जोसेफ, ग्रिवेस प्रत्येकी एक बळी).









