वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीच्या ताज्या वनडे मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मागे टाकत आघाडीचे स्थान पुन्हा काबिज केले आहे. शनिवारी झालेल्या वनडे मालिकेतील सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा मोठ्या फरकाने पराभव करीत पाकला मागे टाकले.
ऑस्ट्रेलियाने या विजयानंतर 121 रेटिंग गुण मिळवित पाकवर केवळ एका गुणाची आघाडी घेतली. आयसीसी सांघिक मानांकनात भारत 114 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू असल्याने या क्रमवारीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे.









