महाराष्ट्रातील महापुरूषांवरील विधानाचा वाद मिटताना दिसत नसतानाच मुघल सम्राट औरंगजेब हा हिंदू द्वेषी नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. य़ा विधानानंतर आम. आव्हाड यांनी सारवासारव करून औरंगजेब हा एक क्रूरकर्मा होता,आणि त्याने सिंहासनासाठी आपल्या भावाची आणि वडिलांचीही हत्या केल्याचे म्हटले.
पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले, “छत्रपती संभाजी हे संगमेश्वरातील सरदेसाई वाड्यात होते याची माहिती औरंगजेबाला कोणी दिली? खरा इतिहास इथेच दडलेला आहे. त्यानंतर त्यांना बहादूरगडावर आणून तेथे त्यांचे डोळे काढण्यात आले. बहादूरगड किल्ल्यापासून जवळच विष्णू मंदिर होते. जर औरंगजेब हिंदू द्वेषी असता तर त्याने विष्णू मंदिर देखील पाडले असते.”
पुढे बोलताना आमदार आव्हाड म्हणाले, “माझ्या मते इतिहासात मागे जाण्याचे कोणतेही कारण नाही. कारण यामुळे समाजात नवीन वाद निर्माण होतात.” गेल्या शुक्रवारी राज्याच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचा बचाव करण्यासाठी त्यांनी आपले मत व्यक्त केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








