Kolhapur News : कोल्हापुरात काही तरुणांनी औरंगजाबाचे स्टेटस ठेवल्या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली. याबाबत कोल्हापूर बंदची हाक देण्यात आलीय. आज सकाळपासूनच कोल्हापुरात हजारोंच्या संख्येने शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमले. पोलीसांनी आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले. आक्रमक कार्यकर्त्यांनी महानगरपालिके जवळील रिक्षा उधळून लावली तर चप्पल लाईनजवळील दुकान फोडले. या सगळ्या घटनेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, भाजप नेते , आमदार अतुल भातखळकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी खासगी माध्यमाला प्रतीक्रिया दिलीय. औरंगजेबाचे भक्त असतील तर त्यांना पाकिस्तानात पाठवा असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत काय म्हणाले
याच मातीत औरंगजेबाला गाडलं आहे.जर कोणी औरंगजेबाचे भक्त असतील तर त्यांना महाराष्ट्रातच नाही तर देशात राहण्याचा हक्क नाही. त्यांनी पाकिस्तानात चालत व्हावं. ही शिवसेनेची, बाळासाहेबांची भूमिका होती. ज्या लोकांनी स्टेटस ठेवला त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
भाजप नेते , आमदार अतुल भातखळकर
जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलयं तेव्हापासून समाजात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न राज्यातील काही संघटना करत आहेत. आणि त्याला पाठिंबा विरोधी पक्षातील काहींचा आहे. औरंगजेबाचा फोटो ठेवला जातो मग तो व्हायरल होतो. औरंगजेबाचा पुळका कोणाला आला आहे. औरंगाबाद शहराच नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज केलं.त्यावरुन आंदोनल करण्यात आलं त्याला काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.म्हणूनच एका राजकीय पक्षाचे आमदार बोलले होते की, पुढील वर्ष दंगलीचे असणार. हे त्यांना कस कळलं असा सवालही त्यांना केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यसरकार यावर लक्ष ठेवून आहे. त्याला पायबंद घालतील.येणाऱ्या काळात यामागे कोणती शक्ती आहे.खरे चेहरे कोण आहेत ते बेनकाब करण्याचे काम राज्यसरकार, गृहखाते करील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
माजी आमदार राजेश क्षीरसागर यांची प्रतिक्रिया
ज्या संभाजी महाराजांचे हालहाल करून औरंगजेबाने त्यांना मारले त्या औरंगजेबाचे उदात्तीकरण कशाला पाहिजे.अतुल भातळकरांनी जे सांगितले ते तीन महिन्यापूर्वी राजकीय पक्षाच्या एका व्यक्तीनं दंगली होतील अस भाकित केलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षातील लोक जाणीवपूर्वक महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत अस म्हणण चूकीचं ठरणार नाही.कोल्हापुरात शांतता पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजर्षी शाहू महाराजांनी समतेची शिकवण दिलीयं.त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात वातावरण चिघळणार नाही. मात्र यामागे कोण आहे याचा तपास करण गरजेचं आहे.त्याचबरोबर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करण गरजेचं आहे.आंदोलनाच्य़ा ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जमले असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
मंत्री शंभूराज देसाई
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण ही राज्यसरकारची जबाबदारी आहे.पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत.जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई होतील. कायदा हातात घेऊ नका असे आवाहन मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं आहे.








