Hasan Mushrif News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली होती. त्यानंतर शहरात दोन दिवस तणावाचे वाचतावरण निर्माण झाले होते. अजूनही शहरात ठिक-ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोल्हापुरात वातावरण निवळत आले असतानाच पुन्हा कागलमध्ये एका 38 वर्षीय तरुणाने टिपू सुलतानचे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याने कागल शहरात तणाव निर्माण झाला.या तरुणाला अटक करण्यात आले आहे.महाराष्ट्रात अलीकडे अशा घटना घडल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होवू लागल्या आहेत.दरम्यान,राष्ट्रवादीचे नेते,आमदार हसन मुश्रीफ यांनी याबाबत प्रतीक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही. मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजवून सांगने गरजेचे आहे.कोल्हापूरमधील दंगल हे कोल्हापूर पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युर आहे. गेल्या आठवड्यापासून कोल्हापूरातील वातावरण बिघडत आहे.शिवरायांना मुस्लिमांबद्दल कधीच आकस नव्हता.त्यामुळे औरंगजेब आपला शत्रूच आहे त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही. काल सुद्धा पोलिसांनी कागल मधील संबंधित मुलाला ताब्यात घेतल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या आठवड्यापासून कोल्हापुरातील वातावरण बिघडत आहे. शिवरायांना मुस्लिमांबद्दल कधीच आकस नव्हता. 22 वतनदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांसोबत मुस्लिम होते.तर मावळे किती मुस्लिम किती असतील ? त्यामुळे औरंगजेब आपला शत्रूच आहे त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही. पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आहे. जसजसे निवडणुका जवळ येतील तसे वातावरण बिघडत जाते आहे. त्यामुळे शांतता राखा असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले.








