Indian Youtuber Bindas Kavya Missing : औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे. २४ तास उलटले तरी तिचा शोध लागला नाही. तिच्या आई- वडिलांनी छावा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेतला जात असून तपास सुरु आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या काल दुपारी २ वाजता घरातून बाहेर पडली ती घरी परत आलीच नाही. घरात कौटुंबिक वाद झाल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. ती घरी परत आली नाही म्हणून आई- वडिलांशी तिच्या मित्र-मैत्रीणींकडे चौकशी केली परंतु, तिचा काहीच पत्ता लागला नाही. त्यांनी काव्या संदर्भात कोणाला माहिती मिळताच आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन व्हिडिओ शेअर करून केले आहे. पोलिस आणि सायबर पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेत आहेत.
कोण आहे बिंदास काव्या
औरंगाबाद शहरात राहणारी बिंदास काव्या प्रसिद्ध युट्यूबर आहे.
बिंदाच काव्याचे ४३ लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत.
तिच्या व्हिडीओला लाखापेक्षा अधिक व्ह्ूज आहेत.
Previous Articleमिरजेत एसपींचा ‘चंद्रा’वर जल्लोष
Next Article इस्लामपूर पोलीसांचा मिरवणुकीत झिंगाट डान्स









