नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी ऑडी आपल्या काही कार्सच्या किमती 1 मे पासून वाढविणार असल्याची माहिती आहे. कार निर्मितीकरता येणाऱ्या खर्चामध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन कंपनीने 1 मे पासून ठराविक मॉडेलच्या किमती 1.6 टक्के वाढवण्याचे ठरवले आहे. यामध्ये क्यू थ्री आणि क्यू थ्री स्पोर्ट्सबॅक या गाड्यांचा समावेश आहे. अबकारी शुल्कामध्ये झालेली वाढ त्याचप्रमाणे अंतर्गत खर्चात झालेली वाढ यामुळे कार्सच्या किमती वाढविल्या जात आहेत. याआधी कंपनीने क्यू आठ सेलेब्रेशन, आरएस 5, आणि एस 5 यांच्या किमती 1 एप्रिलपासून 2.4 टक्के वाढविलेल्या आहेत. दुसरीकडे मर्सिडिज बेन्ज इंडिया यांनी विविध मॉडेल्सच्या 1 एप्रिलपासून 2 लाख ते 12 लाखापर्यंत वाढवल्या आहेत.









