वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या महिलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंच्या लिलावाचा कार्यक्रम मुंबईत 9 डिसेंबरला आयोजित केला आहे. भारतामध्ये महिलांची प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा दुसऱ्यांदा भरविली जात आहे. सदर स्पर्धा येत्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान खेळविली जाण्याची शक्यता वर्तविली जाणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाने झालेल्या पहिल्या महिलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. त्यांनी गेल्या मार्चमध्ये मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गड्यांनी पराभव करून जेतेपद मिळविले होते. विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हरमनप्रित कौरकडे सोपविण्यात आले होते. 2023 च्या महिलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणारी मेग लेनिंग हिने अलिकडेच क्रिकेटमधील आपली निवृत्ती जाहिर केली होती. 2024 च्या महिलांच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई, दिल्ली, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, गुजरात जायंट्स, युपी वॉरियर्स या पाच संघांचा समावेश राहणार आहे. या स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा लिलाव मुंबईत आयोजित केला आहे. दरम्यान या लिलावापूर्वी 21 विदेशी क्रिकेटपटूंसह एकूण 60 क्रिकेटपटूंनी आपल्या संघातील स्थान कायम राखले आहे.
दिल्ली कॅपिटल्स : स्थान राखणारे खेळाडू – अॅलिसी कॅप्से, अरुंधती रे•ाr, जेमिमा रॉड्रीग्ज, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, एम. कॅप, मेग लेनिंग, मिणू मनी, पूनम यादव, राधा यादव, शेफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दिप्ती, तानिया भाटिया आणि तितास साधू.
गुजरात जायंट्स : अॅश्ले गार्डनर, बेथ मुनी, डॅलियन हेमलता, हर्लिन देओल, लॉरा वुलव्हर्ट, शबनम शकिल, स्नेहा राणा आणि तनुजा कंवर.
मुंबई इंडियन्स : अमनजोत कौर, अमेलिया केर, ट्रायॉन, हरमनप्रित कौर, हिथर, हिली मॅथ्यूज, एच. काझी, ईसाबेल वाँग, जे. कलिता, नाताली स्किवेर, पूजा वस्त्रकार, प्रियांका बाला, सायाका इशाकी, यास्तिका भाटिया.
रॉयल चॅलेंजर बेंगळूर : आशा शोभना, दिशा कसाट, इलिसी पेरी, हिथेर नाईट, इंद्राणी रॉय, कनिका अहुजा, रेणुकासिंग, रिचा घोष, श्रेयांका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन.
युपी वॉरियर्स : अॅलिसा हिली, अंजली सर्वानी, दिप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नेवगेरी, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वि चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस. यशश्री, स्वेता शेरावत, सोफी इक्लेस्टोन, टी. मॅकग्रा.









