वृत्तसंस्था/ ओडेंस
भारताची दुहेरीतील सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी ही स्टार जोडी आज मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या 9 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्सच्या डेन्मार्क ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत देशाच्या मोहिमेचे नेतृत्व करताना त्यांच्या प्रभावी फॉर्मचे जेतेपदात रूपांतर करण्याचा प्रयत्न करेल.
सहावे मानांकन मिळालेली ही आशियाई क्रीडास्पर्धेतील विजेती जोडी स्कॉटलंडच्या ख्रिस्तोफर ग्रिमली आणि मॅथ्यू ग्रिमलीविऊद्ध सलामीचा सामना खेळेल. सात्विक आणि चिराग या हंगामात भारताचे उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आहेत, त्यांनी हाँगकाँग आणि चीन मास्टर्स सुपर 750 स्पर्धांमध्ये सलग दोन वेळा अंतिम फेरी गाठली. या जोडीने पॅरिसमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील दुसरे कांस्यपदक तसेच उपांत्य फेरीतही स्थान मिळवले.
पुऊष एकेरीत या वर्षाच्या सुऊवातीला अमेरिकन ओपनमध्ये पहिला बीडब्ल्यूएफ सुपर 300 मुकुट जिंकणारा आणि जागतिक क्रमवारीत 28 व्या क्रमांकावर असलेला आयुष शेट्टी त्याच्या पहिल्या फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हचा सामना करेल. हा 19 वर्षीय खेळाडू हाँगकाँग सुपर 500 च्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. पण अलीकडच्या आठवड्यांत त्याला लय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. कोरिया आणि चीनमधील स्पर्धेत त्याला लवकर बाहेर पडावे लागले, तर आर्क्टिक ओपनमध्ये ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या कुनलावूत विटिदसरनकडून पराभव पत्करावा लागला.
19 व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनची लढत आयर्लंडच्या न्हाट न्गुयेनशी होईल. 2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील या कांस्यपदक विजेत्याने सप्टेंबरमध्ये झालेल्या हाँगकाँग सुपर 500 मधील उपविजेतेपदासह फॉर्म पुन्हा मिळविला आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये चौथ्या स्थानावर राहिल्यानंतरचा खराब कालावधी संपुष्टात आला. तथापि, अलीकडच्या काळात जपानच्या कोडाई नारोका आणि विटिदसरनकडून झालेल्या पराभवांमुळे त्याने सातत्य राखण्याची गरज अधोरेखित झाली आहे. गेल्या आठवड्यात आर्क्टिक ओपनच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुपर 500 स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी अनमोल खर्ब महिला एकेरीतील तिच्या पहिल्या सामन्यात सातव्या मानांकित इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीशी लढेल.









