नवी दिल्ली
रेमंड कंपनीने ग्रुप मुख्यपदी अतुल सिंग यांची निवड केली असल्याची माहिती आहे. ते यापूर्वी कोकाकोला कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या तेथील दीर्घकालीन कामाच्या अनुभवाचा विचार करूनच सदरची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. कार्यकारी उपाध्यक्षपदी त्यांची नेमणूक होऊ शकते. त्यासाठी संचालक मंडळाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. कोकाकोलात सुमारे 2 दशके त्यांनी सेवा बजावली आहे.









