मालवण । प्रतिनिधी
वायरीतील विविध भजन मंडळांना भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांच्या माध्यमातून भाजपचे जेष्ठ नेते अतुल काळसेकर यांच्या हस्ते पंढरपुरी टाळांचे वाटप करण्यात आले. वायरी येथील आर. जी. चव्हाण मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुभाष दिघे, डॉ. बालाजी पाटील, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, अमिता निवेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रत्येक मंडळाला प्रत्येकी दोन टाळ देण्यात आले. यावेळी विश्वकर्मा भजन मंडळ, भरडेवाडा बाल भजन मंडळ, सातेरी भजन मंडळ देऊळवाडा, रेकोबा ढोलकी भजन मंडळ आणि नवश्री भजन मंडळ या भजन मंडळांनी हे टाळ स्वीकारले. याशिवाय सिंधुकन्या फुगडी मंडळ आडवण या मंडळालाही टाळ देण्यात आले.यावेळी अतुल काळसेकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील कलाकारांना प्रोत्साहन मिळाले आहे.









