घरगुती उपकरणे, स्मार्ट फोन, लॅपटॉपसह इतर उत्पादनांवर मिळवा डिस्काऊंट्स
प्रतिनिधी /बेळगाव
सरत्या वर्षाचा निरोप आनंदाने आणि उत्साहाने घेण्यासाठी क्रोमाच्या फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स, न्यू इयर सेलमध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. भारतातील पहिले आणि विश्वसनीय ओम्नीचॅनेल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर आणि टाटा समूहातील एक सदस्य क्रोमाने उत्पादनांच्या सर्व श्रेणींमध्ये ग्राहकांच्या आवडीच्या गॅजेट्स व उपकरणांवर आकर्षक ऑफर्स सुरू केल्या आहेत. लॅपटॉप्स, मोबाईल, घरगुती उपकरणे, टीव्ही आणि इतर अनेक उत्पादनांची खरेदी करण्याची स्वप्ने पूर्ण करण्याची उत्तम संधी क्रोमामध्ये मिळत आहे. 2 जानेवारी 2023 पर्यंत क्रोमाच्या स्टोअर्समध्ये आणि croma.com वर हा सेल सुरू राहील.
‘सीव्रेट सांता’ खेळण्यापासून आपल्या प्रिय व्यक्तींसाठी आवडीच्या भेटवस्तू खरेदी करण्यापर्यंत-ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रोमाने भारी डिस्काऊंट्स सुरू केले आहेत. तसेच तीन बँड्सदेखील आणले आहेत. लकी ड्रॉ विजेत्यांना स्टोअरमध्ये केलेल्या खरेदीवर रेड बँडवर 10 टक्के सूट, ग्रीनवर 5 टक्के आणि व्हाईटवर 3 टक्के सूट दिली जात आहे. लकी ड्रॉ बँड्स फक्त स्टोअर्समध्ये 23 ते 25 डिसेंबरपर्यंत आणि 31 डिसेंबर ते 1 जानेवारी 2023 पर्यंत या दोन टप्प्यांमध्ये रीडीम करता येतील.
क्रोमामध्ये 5 जी स्मार्टफोन्सच्या किमती फक्त 12,999 ऊपयांपासून सुरू होतात. काही निवडक ब्रँड्सवर क्रोमा 4,999 ऊपयांचे स्मार्टवॉचदेखील मोफत देत आहे. गेमिंगचे शौकिन जर अपग्रेडबाबत विचार करत असतील तर 12 जनरेशन इन्टेल (आर) गेमिंग लॅपटॉप्सच्या किमती फक्त 54,990 ऊपयांपासून सुरू होतात आणि बजेट लॅपटॉप खरेदी करायचा असल्यास इन्टेल (आर) कोर (टीएम) आय 3 ची किंमत फक्त 34,990 ऊपयांपासून पुढे आहे.
उत्सुक ग्राहकांसाठी क्रोमाने रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशीन, स्मार्टफोन, इयरफोन, टेलिव्हिजन, घरगुती उपकरणे आणि इतर अनेक उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. 4 के यूएचडी टीव्ही फक्त 990 ऊपयांच्या मासिक ईएमआयवर मिळत आहे. एलजी ओएलईडी टीव्हीसाठी मासिक ईएमआय फक्त 2990 ऊपये आहे. फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनच्या किमती 20,990 ऊपयांपासून आणि साईड-बाय-साईड 1.5 टन 3 स्टार इन्व्हर्टर स्प्लटी एसीच्या किमती फक्त 34,990 ऊपयांपासून पुढे आहेत. घरासाठी खरेदीच्या आकर्षक संधी ग्राहकांची वाट पाहत आहेत. नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद द्विगुणित करण्यासाठी क्रोमा त्यांच्या वेबसाईटवरून खरेदी केलेल्या एएमडी गेमिंग लॅपटॉप्सवर 40 टक्केपर्यंत डिस्काउंट आणि 5000 ऊपयांपर्यंतचे पॅशबॅक देत आहे. स्टोअर्समध्ये निवडक एएमडी रिजन लॅपटॉप्सच्या खरेदीवर 14,000 ऊपयांपर्यंतच्या किमतीच्या मॉनिटरसारख्या फ्रीबीज च् एŸक्सेसरिज मोफत दिल्या जात आहेत.
नाताळ आणि नववर्षाच्या उत्साहाचे रंग खुलविण्यासाठी क्रोमाने पार्टी स्पीकर्सच्या किमती फक्त 2,199 ऊपयांपासून पुढे आणि साउंड बारवर 80 टक्केपर्यंतची सूट देऊ केली आहे.
एन्ड ऑफ द इयर सेलमधील डील्स व ऑफर्सची माहिती croma.com वर मिळेल किंवा आपल्या जवळच्या क्रोमा स्टोअरवर जाऊन तुम्ही आकर्षक किमतींमध्ये डील्सचा लाभ घेऊ शकता.









