शिवराय ग्रुपच्या बालशिवभक्तांनी साकारली आकर्षक कलाकृती
ओटवणे | प्रतिनिधी
सरमळे नांगरतास येथील शिवराय ग्रुपच्या बालशिवभक्तांनी साकारलेली विशालगड व पन्हाळा रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे. शिवराय ग्रुपचे दिवाळीत किल्ले व गड साकारण्याचे यावर्षीचे चौथे वर्ष असून बालशिवभक्त दिव्यम अजयकुमार देसाई यांच्या नेतृत्वाखाली साकारलेल्या विशालगड व पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे.या विशालगड व पन्हाळा किल्ल्याच्या प्रतिकृतीचे उद्घाटन सरमळे सरपंच विजय गावडे, पोलीस पाटील दीपक नाईक, विलवडे येथील सुनिल सावंत, ज्येष्ठ ग्रामस्थ कृष्णा देसाई, प्राजक्ता देसाई, वासुदेव माधव, मोहन देसाई, अजयकुमार देसाई, अर्जुन माधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दिव्यम देसाई याने सादर केलेल्या शिवप्रतिज्ञाने वातावरण शिवमय झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांच्या या कलेचे कौतुक केले. बाल शिवभक्तांच्या शिवराय ग्रुपने पहिल्या वर्षी तोरणा दुसऱ्या वर्षी कोंडाणा तर तिसऱ्या वर्षी रायगड किल्ला साकारला होता. नांगरतास येथील दिव्यम देसाई, संस्कार गावडे, लोकेश महाले, गौरेश गावडे, आर्यन सावंत, स्वामिनी माधव, हर्षदा गावडे, श्रीनिधी गावडे या बाल शिवभक्तांनी हा रायगडचा किल्ला साकारला. या दोन्ही किल्ल्याची मूळ संकल्पना दिव्यम अजयकुमार देसाई याची तर त्यांना प्रसिद्ध मूर्तिकार अजयकुमार देसाई यांचे सहकार्य लाभले.









