प्रतिनिधी/ पणजी
छत्तीसगड (रायपूर) येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे काल 85वे अधिवेशन घेण्यात आले. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा तथा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, राहुल गांधी व इतर प्रमुख नेते या अधिवेशनाला उपस्थित होते. काल झालेल्या या अधिवेशनात गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी उपस्थिती लावली.
गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, केपेचे आमदार आल्टन डिकोस्ता, पक्षाचे गोवा प्रभारी मणिकम टागोर व इतर कार्यकर्त्यांनी छत्तीसगड येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थिती लावली. गोव्यातील नेत्यांनी राज्यातील सद्य:स्थितीतील राजकारणाबाबत राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केली.









