वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशात विकसित अत्याधुनिक लाइट हेलिकॉप्टर ध्रूवमध्ये संभाव्य त्रुटींच्या स्वरुपात काही घटकांमधील डिझाइन अन् धातू विज्ञानसंबंधी त्रुटींची ओळख पटविण्यात आली आहे. हेलिकॉप्टरसंबंधी विशेष तपासणी करण्यात आल्यावर ही माहिती देण्यात आली आहे. काही हेलिकॉप्टर्सची दुरुस्ती करत त्यांना पुन्हा निश्चित स्थानी तैनात करण्यात आले आहे. यातील काही हेलिकॉप्टर्सनी उ•ाणास सुरुवात केली आहे. हेलिकॉप्टरशी निगडित अनेक दुर्घटना विचारात घेत ही चौकशी करण्यात आली होती. वारंवार दुर्घटना घडत असल्याने सैन्य आणि वायुदलाला स्वत:च्या ताफ्यात सामील ध्रूव हेलिकॉप्टरचे उ•ाण रोखण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. सुरक्षा चौकशी पूर्ण झाल्यावर या हेलिकॉप्टरचे उ•ाण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. नौदल, वायुदल आणि सैन्य तसेच तटरक्षक दलाकडे एकूण 325 पेक्षा अधिक ध्रूव हेलिकॉप्टर्स असून दुर्घटनांनतर या सर्व हेलिकॉप्टर्सची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. ध्रूव हेलिकॉप्टर हे हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून डिझाइन अन् विकसित करण्यात आले आहे. ध्रूव हे 5.5 टन वजनी श्रेणीतील एक दुहेरी इंजिन, बहुउद्देशीय हेलिकॉप्टर आहे. ध्रूव हेलिकॉप्टरचे उ•ाण दोन वैमानिकांद्वारे होते अणि यात 12 सैनिक सामावू शकतात. 52.1 फूट लांबीच्या या हेलिकॉप्टरची उंची 16.4 फूट आहे. या हेलिकॉप्टरचा कमाल वेग 291 किलोमीटर प्रतितास तर एकाचवेळी ते 630 किलोमीटर अंतरापर्यंत उ•ाण करू शकते. तसेच कमाल 20 हजार फुटांच्या उंचीपर्यंत हेलिकॉप्टर जाऊ शकते.









