कुपवाड प्रतिनिधी
कुपवाड शहरातील वाघमोडेनगर येथे राहण्राया राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष सागर माने यांच्यावर हला करून पिस्तूल रोखुन ठार मारण्याचा प्रयत्न चार दिवसांपूर्वी घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या चौघांना कुपवाड पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी आष्टा येथे सापळा रचून अटक केली. तर एका अल्पवयीन युवकालाही ताब्यात घेतले आहे.
अटक केलेल्यामध्ये संशयित संदेश रामचंद्र घागरे (वय 21), किरण दादासो कांडिग्रे ( वय 20), अनिकेत दत्ता कदम (वय 20 तिघेही रा वाघमोडेनगर, कुपवाड ) व प्रतिक शिवाजी कोळेकर (वय 19,रा.शरदनगर, कुपवाड ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. फ़िर्यादी सागर राजाराम माने हा शहरातील दत्ता पाटोळ खून प्रकरणात त्याची पत्नी वनिता पाटोळे यांना न्यायालयीन कामात मदत करतो, याचा राग मनात धरून सागर माने याचेवर सोमवारी रात्री संशयित पाचजणांनी मिळून पिस्तूल रोखण्याचा प्रयत्न केला.तसेच चाकूचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, फ़िर्यादी सागर माने यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मुख्य संशा†यत संदेश घागरे व किरण कांडिग्रे यांच्यासह पाच जणानी पिस्तुलचा खटका दाबला. परंतु ती फायर झाली नाही. घाबरलेल्या अवस्थेत सागर पळून जात असताना संशयित घागरे याने त्याचा पाठलाग केला. पळत असताना पाय घसरून सागर रस्त्यावर पडल्याने त्याला दुखापत झाली.यावेळी सागरचा मित्र सरफराज समलेवाले त्याला वाचवण्यासाठी आला. संशयित संदेश घागरे याच्या हातातील पिस्तुल घेऊन संशयित अनिकेत कदम याने सरफराज समलेवाले याचेवर रोखून धऊन त्यालाही जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्तुलचा खटका दाबला. यावेळीही पिस्टल फायर झाली नाही. संशयित किरण कांडिग्रे याने सागर मानेला चाकूचा धाक दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला. वाचवा…वाचवा असे म्हणून सागर स्टेजकडे पळत गेला. आवाज ऐकून नागारिक येत असल्याचे दिसून येताच संशयितांनी पळ काढला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर कुपवाड पोलिस व सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे आधिकारी व कर्मचारी यांची पथके हलेखोरांच्या शोधासाठी रवाना झाली होती. हलेखोर आष्टा (ता.वाळवा) येथील एसटी स्टॅण्डवर लपल्याची गुप्त माहिती हवालदार साचिन कनप व जितेंद्र जाधव यांना मिळाली. अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या माहितीनुसार आष्टा बसस्थानकाजवळ सापळा रचला. चारही संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले. एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेऊन सर्व संशयितांना कुपवाड पोलिस ठाण्यात आणून चौकशी करून अटक केली. चारही जणांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.तपास सहाय्यक निरीक्षक दिपक भांडवलकर करीत आहेत.








