महाराष्टाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एका मुलाखतीत महाविकास आघाडीच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला असे विधान केले. या कामासाठी तत्कालीन पोलीस कमिशनर संजय पांडे (Sanjay Pande) यांना महाविकास आघाडीने (MVA) सुपारी दिली होती असा खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. त्यावर आता महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांनी यावर कडवट प्रतिक्रिया देऊन देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस आपसे ये उम्मीद न थी….राज्यात गुन्हेगारी वाढत असताना राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काय केले हे बोलायला हवे. यावर काही न बोलत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जे गंभीर आरोप केले आहेत याचे मला आश्चर्य वाटत आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हिंजवडीतून बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे विधान हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या अपेक्षा नसल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, “देवेंद्र जी आपस ये उम्मीद न थी….अशा खोट्या नाट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा पुण्यात कोयता गॅंग…धायरीत गोळीबार…अशा घटना घडल्या असताना राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी यावर बोलायला हवे. फडणवीसांना विनंती आहे की पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात सगळीकडे गुन्हेगारी वाढत असताना त्यांनी यावर बोलावे.” असे त्या म्हणाल्या. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर मला आश्चर्य वाटत नसून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य पाहिजे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








