मालवणात खळबळ
मालवण । प्रतिनिधी
मालवण शहरात बसस्थानक समोरील एका खासगी प्रयोगशाळेमध्ये कामाला असलेल्या कर्मचारी महिलेवर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने मालवण शहरात खळबळ उडाली आहे. गंभीर भाजलेल्या महिलेला मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे. हे कृत्य कोणी केले याबाबत, सीसीटीव्ही फुटेज, महिलेचा जबाब अन्य माहिती घेऊन पोलीस तपास करत आहे.









