ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न काहींनी केला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहित पवार यांचं पुण्याच्या हडपसर परिसरातील सृजन हाऊस या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय आहे. शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या या कार्यालयात प्रवेश करत कार्यालयाची जाळपोळ केली. तसेच कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकलही त्यांनी पेटवली.
याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलिसांनी शेजारील सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये तीन व्यक्ती रोहित पवार यांच्या कार्यालयात येऊन जाळपोळ करुन गेल्याचे दिसून येते. या तीन व्यक्ती कोण? त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला याचा तपास पोलीस करत आहेत.