वृत्तसंस्था / कोलंबो
आगामी होणाऱ्या महिलांच्या तिरंगी वनडे मालिकेसाठी यजमान लंकन महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी चमारी अट्टापटूकडे सोपविण्यात आली आहे. सदर तिरंगी मालिकेत लंका, भारत आणि द. आफ्रिका यांचा समावेश आहे.
या तिरंगी मालिकेसाठी बुधवारी लंकन निवड समितीने संघाची घोषणा केली. या संघात 17 सदस्यांचा समावेश आहे. अलिकडे लंकन महिला संघाला न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे या आगामी तिरंगी मालिकेसाठी लंकन संघामध्ये 8 खेळाडू बदलण्यात आले आहेत. लंकन संघामध्ये विश्मी गुणरत्ने, निलाक्षी सिल्वा, हसीनी परेरा, पी. वत्सला, देवमी विहांगा, इनोका रणवीरा, एस. करुणारत्ने यांना संघात स्थान मिळाले आहे. या तिरंगी मालिकेतील पहिला सामना 27 एप्रिलला यजमान लंका आणि भारत यांच्यात होणार आहे.
लंकन महिला संघ: चमारी अट्टापटू (कर्णधार), व्ही. गुणरत्ने, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षी सिल्वा, कवीशा दिलहारी, अनुष्का संजीवनी, हसिनी परेरा, पी. वत्सला, एम. नीनायकरा, डी. विहांगा, इनोका रणवीरा, इनोशी फर्नांडो, एच. करुणारत्ने, रश्मिका सेवांदी, मलिका मदेरा, सुगंधीका कुमारी आणि ए. कुलसूर्या
तिरंगी मालिका वेळापत्रक
लंका वि. भारत पहिला सामना रविवार दि. 27 एप्रिल
भारत वि. द. आफ्रिका दुसरा सामना मंगळवार 29 एप्रिल
लंका वि. द. आफ्रिका तिसरा सामना शुक्रवार दि. 2 मे
लंका वि. भारत चौथा सामना रविवार दि. 4 मे
द. आफ्रिका वि. भारत पाचवा सामना बुधवार 7 मे
लंका वि. द. आफ्रिका सहावा सामना शुक्रवार 9 मे
अंतिम सामना रविवार 11 मे









