कास पठार
कास पठार परिसरातील पाळीव जनावरांवर रानटी प्राण्यांचे हल्ल्याचे प्रकार वाढले असून गुरुवारी दुपारी पेट्री ता. सातारा गावच्या आंब्याचे पाणी या शिवारात अनुसया आत्माराम मोरे या आपल्या 10 ते 12 शेळ्यांना घेऊन चारण्यासाठी गेल्या होत्या शेळ्या चारत असताना अचानक बिबट्यानं त्यांच्या समोर शेळीवर हल्ला केला शेळीच्या मानेलाच धरल्यामुळे शेळी जागेवरच गतप्राण झाली असा हा अचानक हल्ला झाल्यामुळे अनुसया मोरे घाबरून जोराजोराने ओरुडू लागल्या आणि काटी जमिनीवर जोराजोरात आपटल्यामुळे बिबट्याने शेळीची मान सोडून कड्याच्या दिशेने धूम ठोकली शेळी जागेवरच गतप्राण झाल्यामुळे अनुसया आत्माराम मोरे यांचे जवळजवळ वीस हजार रुपये नुकसान झाले आहे.
वन विभागाला ही माहिती मिळताच तातडीने रोहोट बीटचे वनपाल राजाराम काशीद वनरक्षक सुनील शेलार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांला दिले आहे
लोकांनी जगायचं कसं
जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे शेती होत नाही त्यामुळे कास पठार परिसरातला स्थानिक ग्रामस्थ स्थलांतरित झाला आहे जे काय मोजकेच लोक गावात राहतात उदरनिर्वासाठी ते शेळी पालन पशुपालन करत आहेत त्यांच्यावरतीही हल्ल्याचे प्रमाण वाढले असून कास पठार परिसरातील लोकांनी जगायचं कसं हाच एक यक्ष प्रश्न लोकांसमोर आहे
पेट्री मध्ये शेळी वरती हल्ला झाल्याची बातमी कळताच आम्ही तातडीने पेट्री या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही काही घडल्यास वन विभागाला तातडीने कळवावे
सोमनाथ जाधव अध्यक्ष कास पठार स्थानिक भूमिपुत्र संघटना









