युक्रेनची राजधानी कीव्ह नजीक असणाऱया युक्रेनच्या एका क्षेपणास्त्रनिर्मिती केंद्रावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. ज्या क्षेपणास्त्रांनी रशियाची युद्धनौका बुडविली होती, त्यांची निर्मिती याच केंद्रात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. रशियाची ही युद्धनौका काळय़ा समुद्रात बुडविण्यात आली होती.
रशियाच्या युद्ध विमानांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात हे केंद्र शुक्रवारी उद्धवस्त झाले असे सांगितले जाते. या प्रकल्पाची पुनर्निमिती करण्यासाठी किमान एक अब्ज डॉलर्सचा खर्च येईल, अशी शक्यता आहे. या केंद्रात पूझ क्षेपणास्त्रांची निर्मितीही केली जात होती. हे केंद्र नष्ट होणे हा युपेनला मोठा धक्का आहे.









