ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना आज सकाळी शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान घडली. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले आहेत. राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येते.
देशपांडे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी शिवाजी पार्कवर मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी चार अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट खेळताना वापरले जाणाऱ्या स्टंपने देशपांडे यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या चारही हल्लेखोरांनी आपला चेहरा कपडय़ाने झाकला होता. या हल्ल्यात देशपांडे जखमी झाले असून, त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचार करुन देशपांडे यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.